मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
हे वाचलंत का? - अंजलीताईंनी पुन्हा एकदा अर्धवट...; मंत्री धनंजय मुंडेंकडून आरोपांचे खंडन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. मुंबईतील अनेक पोलिस स्टेशनमध्ये हा धमकीचा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आहे. हा धमकीचे ईमेल कुणी केला याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे यात म्हटले आहे. या पार्श्वभूमिवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून याबाबतचा सखोल तपास करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. लवकरच हा धमकीचा मेल कुणी केला? हे तपासात पुढे येईल.