बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा! अमरावतीत ६ जणांविरूद्ध एफआयआर दाखल

19 Feb 2025 12:39:05
 
Kirit Somaiyya
 
अमरावती : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळयाप्रकरणी अमरावती येथे ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली.
 
राज्यभरात बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे थैमान असून किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणाची पाळेमुळे अमरावती आणि अकोल्यापर्यंत पोहोचली आहेत. दरम्यान, आता अमरावती आणि अकोल्यात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  'छावा' सिनेमा टॅक्स फ्री होणार? काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
 
या सहा अर्जदारांनी दाखल केलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात बनावट दस्तावेज सादर करून जन्म नोंदीचे आदेश प्राप्त करून घेतले. या सहा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0