ढाका : बांगलादेशात पिरोजपूर जिल्ह्यातील नझीरपूरमध्ये शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी कट्टरपंथी जमावाने एका हिंदू कुटुंबावर हल्ला केला. त्यानंतर दुर्गा मंदिरावर हल्लेखोरांनी हल्ला केला. नंतर १५-२० कट्टरपंथीयांनी रेबती गायेन यांच्या दुकानावरील सामान लुटले. अशातच पत्नी बिथी गायेनवरही हल्ला करण्यात आला होता. यावेळी कट्टरपंथींनी हिंदूंना लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये १० हिंदू जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुर्गा मंदिर समितीचे अध्यक्ष मिलन गायन आणि त्यांची पत्नी इराणी गायन यांचाही पीडितांमध्ये समावेश आहे. कट्टरपंती जमावाने दुर्गा मंदिराची मूर्तीही नष्ट करण्यात आली. त्यांच्याकडे रॉड आणि पाईप होते. हल्लेखोरांची ओळख पटली असता छब्बीर शेख, मुस्तकीन शेख आणि नयन शेख अशी त्यांची नावे आहेत. मात्र यामध्ये इतरांची ओळख अद्यापही पटलेली नाही. अतिरेक्यांनी हिंदू व्यावसायिकाला मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून त्यांनी पळ काढला.
या संदर्भात रेबती गायन यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अधारे पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. छब्बीर शेख, मुस्तकीन शेख आणि नयन शेख यांना अटक करण्यात आली. दरम्यान, दुर्गा मंदिर समितीचे अध्यक्षांनी मंदिरातील पूजा अर्चना पुन्हा एकदा सुरू झाली आहे.