मुंबई : आधीच कोकणात उबाठा गटाचे गळतीसत्र सुरु असताना आता तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत याबाबत उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - भविष्यात भास्कर जाधवांचे मार्गदर्शन मिळणार असेल तर स्वागत! मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
नुकतेच उद्धव ठाकरेंचे शिलेदार राजन साळवी यांनी त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवाय रत्नागिरीतील अनेक पदाधिकारीदेखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील हे गळती सत्र सुरुच असताना आता तीन जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.