युद्धविरामानंतर इस्त्रायली नागरिक मायदेशी परतले

15 Feb 2025 17:11:42
 
Israel
 
गाजा : इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामानंतर युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडले जात आहे. युद्धानंतर झालेल्या करारानंतर युद्धविराम मिळाला असून यामध्ये आता हमास या दहशतवादी संघटनेने १५ फेब्रुवारी रोजी आणखी ३ इस्त्रायली नागरिकांची सुटका केली आहे.
 
युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडण्यात आलेल्यांमध्ये  इअर हॉर्न, सागुई डेकेन-चेन आणि साशा ट्रोफानोवा अशी त्यांची नावे आहेत. अशातच ४९८ दिवसानंतर त्यांची सुटका करण्यापूर्वी हमासने एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात इस्त्रायलींनी स्वत:ची प्रशंसा केली होती.
 
हमासच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या इस्त्रायलनेही यावेळी आपला राग राग व्यक्त केला. ३६९ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यापूर्वी, त्यानी एक विशेष टी-शर्ट परिधान करण्यात आला होता. त्यावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, 'आम्ही विसरणार नाही आणि माफ करणार नाही.'
 
युद्धबंदी करारानंतर इस्त्रायली ओलीस आणि पॅलिस्टिनी कैद्यांची ही सहावी देवाणघेवाण होती. हमासने आतापर्यंत इस्त्रायलमधील १९ आणि थायलंडमधील ५ जणांना सोडले आहेत. अजूनही ७३ इस्त्रायली हमासच्या ताब्यात आहेत.
 
Powered By Sangraha 9.0