मुंबई : राजन साळवी यांच्यानंतर आता विदर्भातील उबाठा गटाच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
विदर्भातील चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर दुसरीकडे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, अर्जुनी मोरगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने लवकरच भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.