ढाका : बांगलादेशाची (Bangladesh) राजधानी ढाकामधील तुरागच्या एका मंदिरावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला आणि दोन मूर्तींची तोडफोड केली. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास सेक्टर १८ विभागात घडली आहे. सोलाहाटी सार्वजनिक दुर्गा मंदिरात असलेल्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घटनेबाबत आता तुराह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही कोणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरोग पोलिसांनी या प्रकरणाची माहिती एका वृत्तपत्राला देण्यात आली आहे.
शोलाहाटी युनिव्हर्सल दुर्गा मंदिराचे अध्यक्ष शांती बाबू यांचे पुत्र पलाश सरकार यांनी घडलेल्या घटनेची माहिती एका वृत्तपत्राला सांगितली की, पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास काही लोक एका पांढऱ्या रंगाच्या चारचारी वाहानातून आले. त्यांनी मंदिरावर हल्ला केला, तसेच मूर्तीची तोडफोड करत त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
यावेळी तक्रारदार पलाश म्हणाले की, या हल्ल्यानंतर दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आम्ही मंदिर रिकामे न ठेवता सरस्वतीची मूर्ती ठेवली. त्यावर हल्ला झाला, तोडफोड झाली आणि मूर्तीवर आघात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहिमेवर आहेत. अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेले नाही. मात्र लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात सीसीटीव्हीमधील फुटेजही तपासण्यात येत आहेत.