चंदीगड : पंजाबमध्ये या वर्षात सर्वात मोठा हेरॉइनचा (Heroine) साठा जप्त करण्यात आला आहे. अमृतसह ग्रामीण पोलिसांनी एका अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यावेळी संबंधिताकडून एकूण ३० किलो हेरॉइन ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी शुक्रवारी दिली. तसेच१४ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अमृतसर ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपीची ओळख गुरसिमरनजीत सिंह उर्फ सिमरन अशा आहे. आरोपी हा अमृतरमधीलच असल्याची माहिती समोर आली. हेरॉइनचा एक तुकडा जप्त करण्याव्यतिरिक्त, पोलीस प्रशासनाने त्याचे चार चाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, गुरसिमकनजीत सिंह मोठ्या प्रमाणात हेरॉइनची तस्करी करत होता. पाकस्थित असलेल्या तस्करांनी ड्रोनचा वापर करत तस्करी केली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील आणखी धागेदोरे लवकरच तपासातून समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
अमृतसरचे वरिष्ठ ग्रामीणचे पोलीस अधिक्षक चरणजीत सिंह यांनी कारवाईची माहिती देताना सांगितले, आरोपी गुरसिमरनजीत सिंह यांचा अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा सहभाग होता. दरम्यान ग्रामीण पोलिसांनी संशयित कारची तपासणी केली. त्यावेळी गाडीत लपवून ठेवण्यात आलेल्या काळ्या पिशवीमध्ये प्रत्येकी ७.५ किलो वजनाते हेरॉइनची चार पाकिटं सापडल्याचे सांगण्यात आले आहे. अमृतसर ग्रामीण घरिडा पोली, ठाणेमध्ये एनडीपीएस कायद्याच्या कलम २१ (क) आणि २५ अंतर्गत एफआयआर दाखल केला.