गांधीनगर : अवैधपणे बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांविरोधात देशभरात कारवाई सुरुच आहे. या मालिकेत गुजरातमधील अहमदाबादमध्ये १५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करत हद्दपार करण्यात आले. अल्पवयीन मुलींची तस्करीही करण्यात आली. त्यांना वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आले. यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी कारवाईची माहिती दिली आहे. अहमदाबादच्या गुन्हे शाखेने देशाविरोधात कारवायांवर कारवाई केली आणि १५ घुसखोरांना बांगलादेशात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान संघवी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींचे वेश्यव्यवसाय करण्यासाठी तस्करी करणाऱ्या लोकांना अटक करण्यात आली. शिवाय घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे लोकांनाही बांगलादेशात परत पाठवण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
हर्ष संघवी यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलींची वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली जाते अशा लोकांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचाही पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणामध्ये ५० घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले असून १५ जणांना बांगलादेशात परत पाठवण्यात आल्याचे हर्ष संघवी म्हणाले. भविष्यात उर्वरित बांगलादेशींना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, असे सांगण्यात येत आहे.