नाशिकमध्ये काँग्रेस-उबाठाला धक्का! अखेर हेमलता पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

12 Feb 2025 13:00:56
 
Hemlata Patil
 
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
 
यावेळी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार नरेश म्हस्के, खासदार संदीपान भुमरे यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
यासोबतच नाशिकमधील उबाठा गटाच्या सहा वेळा नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर आणि व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे, उबाठा गटाचे माजी नगरसेवक, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातिर यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश काँग्रेस आणि उबाठा गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0