बँकांशी संबंधित सायबर गुन्ह्यांना चाप बसणार; लवकरच नवी प्रणाली स्थापन करणार

11 Feb 2025 17:23:39
banks cyber frauds stops central govt


नवी दिल्ली :   
 रिझर्व्ह बँक आणि सर्व बँकांच्या समन्वयाने म्यूल खाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक प्रणाली स्थापन केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सल्लागार समितीला दिली आहे.

सोमवारी राष्ट्रीय राजधानीत 'सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे' या विषयावर गृह मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत शाह यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, सायबर गुन्ह्यांपासून अधिक सतर्क राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'थांबा, विचार करा आणि कृती करा' या मंत्राबद्दल लोकांना जागरूक केले जाईल याचीही सरकारने खात्री केली आहे. त्याचप्रमाणे आयफोरसी पोर्टलवर एकूण एक लाख ४३ हजार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि १९ कोटींहून अधिक लोकांनी या पोर्टलचा वापर केला आहे.

त्यांनी नमूद केले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव, आयफोरसीच्या शिफारशींनुसार ८०५ अॅप्स आणि ३,२६६ वेबसाइट लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, ३९९ बँका आणि वित्तीय मध्यस्थांनी मदत केली आहे. ६ लाखांहून अधिक संशयास्पद डेटा पॉइंट्स शेअर करण्यात आले आहेत, १९ लाखांहून अधिक खाती पकडण्यात आली आहेत आणि २,०३८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार रोखण्यात आले आहेत, असे शाह म्हणाले.
 
३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सायबर क्राइम फॉरेन्सिक प्रशिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. सायट्रेन' प्लॅटफॉर्मवर, "मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स प्लॅटफॉर्मवर, १०१,५६१ पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि ७८,००० हून अधिक प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत, असे त्यांनी नमूद केले.


 
Powered By Sangraha 9.0