मुंबई : मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय असल्याचा दाखला दिल्याचा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान, यासंदर्भात आता ४ हजार अर्जदारांची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
हे वाचलंत का? - विरोधकांना चितपट करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकले!
मालेगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म दाखला देण्याचा प्रकार पुढे आला आहे. किरीट सोमय्या सातत्याने यासाठी आवाज उठवत असून यासंदर्भात त्यांनी मालेगावचा दौराही केला आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी मालेगावातील जवळपास ४ हजार लोकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी ८ एसआयटीची पथके तैनात करण्यात आली आल्याची माहिती पुढे आली आहे.