उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर'!

11 Feb 2025 11:42:10
 
Shinde
 
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात दिनांक ११ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
सरहद संस्थेच्या वतीने आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 
...असे असेल पुरस्काराचे स्वरुप!
 
५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0