पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ?

10 Feb 2025 22:03:58

अरविंद केजरीवाल
 
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपचा सुफडा साफ केला आहे. काही मुस्लिमबहुल मतदारसंघामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला भगवा फडकवण्यात यश आलंय. अशातच आता एका भाजप आमदाराने अरविंद केजरीवाल यांना पंजाबचे मुख्यमंत्री व्हायचे असल्याचा दावा केला. या प्रकरणी त्यांनी ट्विट केले.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची बैठक बोलावली. अशावेळी असे सांगण्यात येत आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावरल केजरीवाल हे खोटे आरोप करतील. महिलांना पैसे देण्याचे आश्वासन त्यांनी केले होते. मात्र ते सत्यात उतरवले नाहीत, असे खोटे दावे करत केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहत असल्याचा दावा भाजप आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला.
 
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, मी अरविंद केजरीवाल यांना सांगतो की, असे चुकूनही स्वप्नात विचार करू नका. कारण हे पंजाब आहे. पंजाबचे लोक या परिस्थितीला सहन करणार नाहीत. तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार नाहीत. त्यामुळे मी भगवंत मान यांना आग्रह करतो की, हे होण्यापूर्वी आपण आधी सतर्क होणे गरजेचे आहे. आपण कोणाचेही सख्खे नसून त्यांनी सर्वांना धोका दिला आहे. आता पंजाबच्या लोकांसोबत धोका करणार असल्याचा दावा मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0