दिल्लीनंतर पंजाबमध्ये 'आप' सरकार धोक्यात?

10 Feb 2025 23:15:28

AAP
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे आज, मंगळवारी दिल्लीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, राज्याचे मंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दिल्ली निवडणूक निकाल आणि २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होईल. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर केजरीवाल यांना पंजाबची चिंता असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, केजरीवाल हे स्वत:देखील दिल्ली विधानसभा निवडणुकी पराभूत झाले आहेत. परिणामी, आता पक्षाला मोठी गळती लागण्याचीही शक्यता आहे.
पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान हे बंड करू शकतात, असा दावा पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा हे शनिवारपासूनच करत आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, आता केजरीवाल यांच्याकडून मान सरकारमध्ये ढवळाढवण वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुख्यमंत्री मान यांच्यासह किमान ३० आमदार वेगळा विचार करू शकतात, असाही दावा बाजवा यांनी केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0