नवी दिल्ली : सर्वच भारतीयांचे लक्ष लागलेल्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठे बंपर गिफ्ट देण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त असणार आहे. लाखो भारतीयांच्या खिशाला आता दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय उद्योगक्षेत्र, बाजार तज्ज्ञांकडून भारतीय मध्यमवर्गाच्या क्रयशक्तीला चालना मिळण्यासाठी याची मागणी केली जात होती. यातून आता महिन्याला १लाख रुपये मिळवणाऱ्या व्यक्तीला आता कुठलाही कर द्यावा लागणार नाही.
या व्यतिरिक्त जेष्ठ नागरिकांनाही या अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार आहे. आता १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आता करमुक्त असणार आहे. आता सुधारित आयकर परतावा भरण्याची मुदतही ४ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे भारतीयांसाठी हा अर्थसंकल्प खूपच खास म्हणावा लागेल.
नव्या कररचनेनुसार आता करांची रचना खालीलप्रमाणे असणार आहे.
० ते ४ लाख उत्पन्न – शुन्य कर
४ लाख ते ८ लाख – ५ टक्के
८ लाख ते १२ लाख – १० टक्के
१२ लाख ते १६ लाख – १५ टक्के
१६ लाख ते २० लाख – २० टक्के
२० लाख ते २४ लाख – २५ टक्के
अशी कररचना असणार आहे. मध्यमवर्गाला अतिशय दिलासा देणारी घटना ठरली आहे .