कट्टरपंथी साबीर हुसैनचे महाकुंभातील महिला भाविकांप्रती आक्षेपार्ह वक्तव्य

01 Feb 2025 17:37:37
 
Mahakumbh 2025
 
लखनऊ : प्रयागराजमध्ये महाकुंभासाठी (Mahakumbh 2025) आलेल्या महिला भाक्तांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बरेलीमधील कट्टरपंथी तरुणाविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साबीर हुसैन असे आरोपी तरुणाचे नाव असून तो बरेलीमधील मीरगंजचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे शुक्रवारी सांगितले.
 
प्रसारमाध्यमानुसार, पोलीसांनी महाकुंभ २०२५ प्रकरणी महिलांप्रती आक्षेपार्ह खोटी माहिती पसरवणाऱ्या कट्टरपंथी हुसैनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या नेतृत्वात सुरु असलेल्या महाकुंभामध्ये महिलांना नग्न केले जात असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याने सोशल मीडियावर यासंबंधित पोस्टही केली आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
 
हुसैनच्या व्हायरल पोस्टमुळे हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. यामुळे समाजातील लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0