Deva Box Office Collection Day 1: शाहीद कपूरच्या 'देवा'ला संथ सुरुवात, टॉप १० मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश!

    01-Feb-2025
Total Views |


shaid kapoor


मुंबई : रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आणि शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेला ऍक्शन ड्रामा 'देवा' ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे दमदार ओपनिंग मिळाली नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ५ कोटी रुपयांची कमाई केली.
शाहीदच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या आधीच्या चित्रपटाने ६.७ कोटींची ओपनिंग केली होती, त्यामुळे देवा चित्रपट या तुलनेत मागे राहिला. बॉक्स ऑफिसवर आधीच अक्षय कुमारच्या स्काय फोर्स, रामचरणच्या गेम चेंजर आणि कंगना रणौतच्या इमर्जन्सी यांसारखे मोठे चित्रपट असल्याने बॉक्स ऑफिसवरच्या जास्त कमाईची स्पर्धा कठीण ठरली.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात या चित्रपटाची कामगिरी महत्त्वाची ठरणार होती. मात्र, मुंबई आणि पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी प्रेक्षकगिरा दिसली. तसेच, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य भारतातही चित्रपट अपेक्षित कमाई करु शकला नाही. त्यामुळे देवा शाहीदच्या टॉप १० ओपनिंग चित्रपटांच्या यादीत प्रवेश करू शकला नाही. तो हैदरच्या मागे ११ व्या क्रमांकावर राहिला.
देवाने स्काय फोर्सपेक्षा चांगली ओपनिंग घेतली. स्काय फोर्सने २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. देवा चित्रपटाच्या प्रदर्शनात प्रेक्षकांची उपस्थिती पहिल्या दिवशी मर्यादित राहिली, सकाळच्या शोमध्ये केवळ ५.८७ %, दुपारच्या वेळी ९.१८ %, तर संध्याकाळच्या शोमध्ये ९.७७ % इतकी होती. त्यामुळे येत्या आठवड्यात हा चित्रपट किती टिकतो, याकडे लक्ष राहणार आहे.