बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ!

08 Jan 2025 12:37:13
 
SHEIKH HASINA
 
ढाका : (Sheikh Hasina) बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. शेख हसीना यांच्यासह आणखी ९७ जणांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शेख हसीना आणि त्यांच्या समर्थकांची नावे असलेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर युनुस सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेख हसीना यांच्यासह एकूण ९७ जणांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. त्यापैकी २२ जणांवर कथित अपहरणात सहभाग असल्याचा आरोप आहेत, तर इतर ७५ जणांवर जुलै २०२३मधील विद्यार्थीविरोधी आंदोलनादरम्यान हत्येचा आरोप आहे. ६ जानेवारी रोजी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने शेख हसीना यांच्या अटकेचा वॉरंट जारी केला आहे. त्यांना फेब्रुवारी २०२५पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0