प्रदेश संविधान अभियान समितीच्या संयोजकपदी अमित गोरखे यांची नियुक्ती!
07 Jan 2025 13:44:53
मुंबई : भाजप महाराष्ट्र प्रदेश संविधान अभियान समितीच्या संयोजकपदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश संविधान अभियान समितीच्या संयोजकपदी अमित गोरखे यांची नियुक्ती झाली आहे. तर धर्मपाल मेश्राम, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, प्रेरणाताई होनराव तसेच अमित घुगे यांची या समितीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.