सिंधुदुर्गातील देवस्थानांवर वक्फ बोर्डाचा दावा - नितेश राणे

05 Jan 2025 18:27:50
Nitesh Rane

मुंबई : सिंधुदुर्गातील किमान ५० ते ६० टक्के जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा ठोकला आहे. सिंधुदुर्गातील एका सभेमध्ये नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी हा दावा केला. वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या जमिनींवर ताबा करण्यात आला आहे हे तपासणीदरम्यान अनेक देवस्थानांवरदेखील वक्फ बोर्डाचा दावा असल्याचे सांगण्यात आले. नितेश राणे यांनी आपल्या भाषणादरम्यान हा मुद्दा मांडला.

वक्फ बोर्डाच्या कायद्याअंतर्गत राज्य तसेच देशभर अनेक जमिनींवर दावा करण्यात आले. जो वक्फ बोर्ड कुठल्याही इस्लामी राष्ट्रांमध्ये नाही तोच आपल्या देशात रुजवला गेला. आधीच्या सरकारने या बोर्डाला इतके अधिकार देऊन ठेवले आहेत की आता त्यामुळे अनेक लोकांच्या जागा धोक्यात आल्यात. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील आपल्या एका भाषणात ही परिस्थिती समोर आणली.

सिंधुदुर्गात वक्फ बोर्डाने किमान ५० ते ६० टक्के जमिनींवर दावा ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून लोकांना वक्फ बोर्डाबाबत जागरुक राहण्याचा सल्ला दिला. यातून मोदी सरकार आपल्याला नक्की न्याय देतील हेदेखील त्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0