बांगलादेशी घुसखोरांच्या केरळ पोलीस आणि ATS ने आवळल्या मुसक्या

31 Jan 2025 14:34:22
 
Bangladeshi
 
कोची : केरळ राज्यातील कोची या शहरामध्ये काही वर्षांपासून बांगलादेशी (Bangladeshi)  घुसखोरी करत वास्तव्य करत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता केरळ पोलीस आणि दहशतवादी विरोधी पथकाने संबंधित बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्या २७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे बोलले जात आहे.
 
'ऑपरेशन क्लीन' नावाची मोहिम सुरू करण्यात आली असून दहशतवादी विरोधी पथकाने आणि एर्नाकुलम पोलिसांच्या संयुक्त पथकाने राबवली. बांगलादेशींना एका घरातून अटक करण्यात आली आहे. ते अनेक दिवसांपासून केरळातील वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करत होते.
 
 
 
तसेच ते पोटापाण्यासाठी कामही करत होते. त्यापैकी बहुतेकांकडे आधारकार्ड होते. एका दलालाच्या मदतीने बांगलादेशची सीमा ओलांडून भारतीय कागदपत्रे मिळवल्याचा दावा करण्यात आला. तसेच भारतातील केरळ व्यतिरिक्त इतर कुठे गेले होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
दरम्यान आता घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी आरोपींवर पासपोर्ट कायदा आणि परदेशी नोंदणी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. महिन्याच्या सुरुवातीला केरळामध्ये ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. राज्यात अटक करण्यात आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांची एकूण संख्या ३४ झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0