नवी दिल्ली (Budget 2025) : दिल्लीमध्ये ३१ जानेवारी २०२५ रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर अभिभाषण केले. त्यानंतर त्यांनी विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. मात्र आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अकलेचे तारे तोडत त्यांचा अवमान केला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग म्हटलं आहे. तसेच पुअर लेडी असे म्हणत त्याचा अवमान केला.
द्रौपदी मुर्मू या आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांवर भाष्य केले. तसेच त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला आहे. मात्र विकास कामांवर काँग्रेसी वृत्तीला पोटशूळ उठल्याने त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींना पुअर लेडी असे म्हटलं आहे. अभिभाषणादरम्यान त्या दमून गेल्या होत्या त्यावरून सोनिया गांधी यांनी महत्प्रयास गेला.
त्यावर आता भाजपाध्यक्ष जे.पी. नड्ड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चपराक लगावत माफी मागा अशी त्यांनी मागणी केली आहे.
सोनिया गांधी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर पुअर लेडी असा शब्दप्रयोग केला. त्यावर आता तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांनी केलेली टीका ही जाणीवपूर्वक असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षाच्या उच्चभ्रू सामान्यांविरोधी आणि आदिवसींविरोधी स्वभावाचे दर्शन घडवत असल्याचे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
"मी आणि प्रत्येक भाजप कार्यकर्ता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर सोनिया गांधी यांनी "गरीब वस्तू" हा शब्दप्रयोग केल्याचा तीव्र निषेध करतो. अशा शब्दांचा जाणीवपूर्वक वापर काँग्रेस पक्षाच्या उच्चभ्रू, गरीबविरोधी आणि आदिवासीविरोधी स्वभावाचे दर्शन घडवतो," असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच नड्डा यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, असे ते पुढे म्हणाले आहेत. "मी मागणी करतो की काँग्रेस पक्षाने माननीय राष्ट्रपती आणि भारतातील आदिवासी समुदायांची बिनशर्त माफी मागावी," असे ते पुढे म्हणाले.