बंगळुरू : कर्नाटकातील रायचूर शहरामध्ये मुबिन नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने एका युवतीला निकाह करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या प्रस्तावास नकार दिल्याने कट्टरपंथी
मुबिनने युवतीची हत्या केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
युवतीही सिंधानूर शहरातील एका खाजगी महाविद्यालयात एमएससीचे शिक्षण घेत होती. युवतीसोबत विवाह करण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. त्यानंतर युवतीचा गळा चिरत तिची हत्या केली. मृत युवतीचे वय वर्षे हे २४ असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, पीडित युवती आणि आरोपी एकमेकांसोबत गेल्या सहा वर्षांपासून ओळखतात. मात्र पीडितेचे पालक आपल्या मुलीचा विवाह इतर पुरुषासोबत करणार असल्याचा विचार करत होते.
ही माहिती समोर येताच पीडितेवर विवाह करण्याचा दबाव आणण्यात आला. नकार दिल्याने त्याने लिंगासगुरुहून सिंधानूरला जाणाऱ्या मुलीवर हल्ला करण्यात आला. आरोपीने सिंधानूरल सरकारी पदवी महाविद्यालयाजवळ मुलीच्या मानेवर वार करण्यात आला. तिचा गळा चिरून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपीने
शिफाच्या पालकांनी ज्या व्यक्तीसोबत तिचा विवाह निश्चित करण्यात आला होता त्याच्या दुकानात जाऊन त्याने गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी संबंधित घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी महाविद्यालयात सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात आता आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.