कट्टरपंथी इम्रान सुख्खाने महादेवाच्या शिवलिंगाचा केला अवमान

30 Jan 2025 18:32:04

Shiva
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यामध्ये महादेवाच्या शिवलिंगाचा अवमान केल्याची घटना घडली आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आता हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे बोलले गेले आहे. शिवलिंगाचा अवमान केलेला व्यक्ती हा कट्टरपंथी असून इम्रान सुख्खा असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी ३० जानेवारी २०२५ रोजी घडली आहे. या प्रकरणात आता इम्रान सुख्खाचा पोलिसांनी शोध घेत ताब्यात घेतले आहे.
 
आरोपीने बुधवारी २९ जानेवारी रोजी शिवलिंगावर पाय ठेवत व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ त्याच्या इंस्टग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर हिंदू संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
 
हिंदू संघटनांनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने जाणूनबुजून हिंदू देवतेचा अवमान केला आहे. तक्रारदाराने तक्रारीत म्हटले की, आरोपीने व्हिडिओ शूट केला आणि तो त्याच्या सुख्खा महाराज नावाच्या सोशल मीडियाच्या खात्यावरून अपलोड केला होता. यावेळी पोलिसांनी रिलचा स्क्रीनशॉट काढत पोलिसांनी सादर केला. त्यानंतर आता आरोपीविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात सांगितले की, तक्रारदाराने भारतीय न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सुख्खाने केलेल्या या कृत्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. पोलिसांनी सख्खावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. त्याला न्यायालयामध्ये दाखल केले जाईल अशी माहिती समोर आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0