माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवा! नरेंद्र पाटील यांचे कामगारमंत्र्यांना निवेदन
30-Jan-2025
Total Views |
मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
माथाडी सल्लागार समिती आणि विविध माथाडी बोर्डाच्या पुनर्रचना कराव्या, त्यावर अनुभवी कामगार नेते आणि माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणूका कराव्यात, माथाडी मंडळात कामगारांच्या शिकलेल्या मुलांना सेवेत घ्यावे तसेच अन्य मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. दरम्यान, माथाडी कामगारांच्या प्रश्नांसंबंधी लवकरच सर्व सबंधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे.