दिल्ली पोलिसांनी भगवंत मान यांच्या निवासस्थानी छापा टाकल्याचा आपकडून अपप्रचार
दिल्ली पोलिसांनी छापा टाकला नसल्याची दिली स्पष्टोक्ती
30-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकल्याचा दावा केला. मात्र आता दिल्ली पोलिसांनी सर्व प्रकारचे निरर्थक दावे फेटाळले आहेत. नुकतेच काही दिवसांआधी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नदीत विष मिसळ्याचा दावा केला. त्यावरून दिल्लीतील राजकारण पेटले आहे. आमप भाजपचा खोटा अपप्रचार करत असल्याचे दिसून येत आहे.
गुरूवारी ३० जानेवारी रोजी आपने आरोप केला की, दिल्ली पोलिसांनी एका स्थापन करत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कपूरथला हाऊस या निवासस्थानी छापा टाकल्याचा दावा केला आहे. असातच आता दिल्ली पोलिसांनी हे दावे खोटे असल्याचे फेटाळले आहेत. यापैकी कोणतीही एक कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिल्ली पुलिस @BhagwantMann जी के दिल्ली के घर पर रेड करने पहुँच गई है।
भाजपा वाले दिन दहाड़े पैसे, जूते, चद्दर बांट रहे हैं- वो नहीं दिखता। बल्कि एक चुने हुए मुख्यमंत्री के निवास पर रेड करने पहुँच जाते हैं।
दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशी यांनी त्याच्या सोशल मीडियावरील X ट्विटर अकाऊंटवर हे यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री बगवंत मान यांच्या निवासस्थानी धाड टाकली. एकाबाजूला भाजप चादर, चप्पला वाटत आहेत. ते दिल्ली पोलिसांना दिसत नाही. याचे उत्तर ५ तारखेला मिळेल, असे ट्विट त्यांनी केले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी धाड टाकली नसल्याचे सांगितले आहे. यावरूनच आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमपचा भाजपप्रती अपप्रचार दिसून येत आहे.
यावर आता दिल्ली पोलिसांनी आपली स्पष्टोक्ती व्यक्त केली. आपण भगवंत मान यांच्या निवासस्थानी धाड मारली नसल्याचे ते म्हणाले आहेत.