२९ जानेवारी! काय आहे दिनविशेष?

29 Jan 2025 15:08:18


image 
 
मुंबई : दरवर्षी २९ जानेवारी हा दिवस ‘भारतीय वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिले वृत्तपत्र सुरू झाले होते.
 
काय आहे इतिहास?
 
२९ जानेवारी १७८० रोजी भारतात ‘बेंगाल गॅझेट’ हेपहिले वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. जेम्स ऑगस्टस हिक्की या आयरीश पत्रकाराने ते सुरू केले होते. ‘हिक्कीस् गॅझेट’ या नावानेही ते ओळखले जायचे. २९ जानेवारी १७८० रोजी कोलकाता येथे ते प्रकाशित झाले. १७८२ ला तब्बल दोन वर्षांनी ब्रिटिशांनी बंद केले. भारतात पत्रकारीतेचा पाया या वर्तमानपत्राने घातला म्हणून २९ जानेवारी  हा दिवस ‘भारतीय वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Powered By Sangraha 9.0