मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात 'बहेलिया' सापळ्याचा वापर करुन बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे (baheliya trap in satara). याप्रकरणी वन विभागाने मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी पाच आरोपींना अटक केली (baheliya trap in satara). कराड तालुक्यातील एका उसाच्या शेतात आरोपींनी बिबट्याची शिकार करण्यासाठी 'बहेलिया' सापळा रचला होता (baheliya trap in satara). यामध्ये अडकलेला बिबट्या सापळ्यातून निसटून उसाच्या शेतात पळून गेला. (baheliya trap in satara)
कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावातील उसाच्या शेतामध्ये लावलेल्या सापळ्यात मंगळवारी बिबट्या अडकल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. याची माहिती गावच्या पोलीस पाटीलांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्याने सापळ्याला हिसका देऊन उसाचा शेतात धूम ठोकली होती. वनकर्मचाऱ्यांनी सापळ्याची पाहणी केली असता तो 'बहेलिया' सापळा असल्याचे निदर्शनास आले. या सापळ्यात बिबट्याचे नख अडकल्याचेही दिसले. वनकर्मचाऱ्यांनी परिसरात फिरून तपासणी केली असता कर्नाटकहून उसी तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडे दोन बहेलिया सापळे, तारेचा पिंजरा, टोकदार लोखंडी सळई, तीन वाघर, एक नायलॉनची दोरी आणि क्लच वायरचा फास इत्यादी शिकारीचे साहित्य आढळून आले. त्यांनी लागलीच प्रकाश बापूराव पवार, सुनिल दिलीप पवार, विशाल दिलीप पवार, मिथुन भाऊराव शिंदे, भीमराव बाबुराव पवार या उस तोड कामगारांना अटक केली. हे सर्व आरोपी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात राहणारे आहेत. चौकशीअंती पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यप्रदेशातील 'बहेलिया गॅग' ही अशा प्रकारे स्थलांतरी कामगारांना हाताशी घेऊन शिकार करत आहे का, असाही प्रश्न या प्रकरणामुळे निर्माण झाला आहे. कारण, यापूर्वी देखील सातारा जिल्ह्यात बहेलिया सापळ्याचा वापर करुन वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. २०२२ मध्ये कुडाशी तालुक्यात बिबट, २०२३ साली तांबावे आणि सुपणे गावात कुत्रा आणि आता कासारशिंबे गावात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथील 'बहेलिया' जमात ही वाघांसारख्या मोठ्या वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी ओळखली जाते. त्यांना 'कटनी गॅंग' या नावाने ओळखले जाते. मानवी जबड्याचा आकाराचे सापळे तयार करुन ते वाघांच्या शिकारीसाठी वापरतात. या सापळ्यांना 'बहेलिया' सापळा म्हणतात. हा सापळा पूर्णपणे लोखंडापासून तयार केलेला असतो. दीड ते दोन फूट साखळीला पुढे चिमटा तयार करण्यात आलेला असतो.