मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस ट्रॉफिक ब्लॉक

28 Jan 2025 13:03:50

mumbai pune



मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी 
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगांव, पुणे मार्गिकेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम सोमवार, दि.२७ ते दि.२९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीमध्‍ये नियोजित करण्यात आले आहे.

हे काम करताना मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे मार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र.४८) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीवरुन सुरु राहणार आहे. या मार्गावर दुपारी १ वाजेनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे मार्गावरून सोडण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0