अक्षरलिपी या सभ्यता आणि संस्कृतीच्या वाहक!

28 Jan 2025 18:54:30
 
Fadanvis
 
मुंबई : अक्षरलिपी या सभ्यता आणि संस्कृतीच्या वाहक असून भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
मंगळवार, २८ जानेवारी रोजी जहांगीर आर्ट गॅलरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा धडाका!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पद्मश्री अच्युत पालव यांनी अक्षरकलेला जनाजनांत पोहोचवले आणि अनेकांना त्यात सामावून घेतले. अक्षरलिपी या बाबी संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती ही इतकी प्राचिन आहे की, त्यात विविध प्रकारच्या लिपी पाहायला मिळतात. या लिपी जिवंत ठेवल्या नाही तर आपला इतिहास आणि आपली समृद्ध संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाही. अच्युत पालव यांच्यासारखी मंडळी या लिपी जिवंत ठेवतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. सुंदर किंवा वळणदार अक्षरांची मोहिनी वेगळी असती. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. अक्षरांच्या माध्यमातून एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या आपल्यापर्यंत पोहोचत असतो," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0