नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने हिंदूविरोधात दंगल भडकवणाऱ्या ताहिर हुसैनला ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने पॅरोलवर जामीनाची परवानगी दिली आहे. त्यानुसार आता २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत प्रचारासाठी सोडण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही अटींचे पालन करावे लागणार असल्याचे सांगितले आहे.
आरोपी हुसैनला प्राचारादरम्यान त्याच्या घरी जाता येणार नाही. पोलीस प्रशासनच त्याचा खर्च उचलणार आहे. जेल मॅन्युअलनुसार त्याला १२ तासांसाठी सोडण्यात येईल अशी अट लागू करण्यात आली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएम मुस्ताफाबादमधून ताहिर हुसैनला उमेदवारी दिली आहे. दरम्यान हुसैन या दिल्लीतील झालेल्या हिंदूंविरोधातील दंगली घडवणारा सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना अंतरिम जामीन देण्याप्रकरणी मते मांडली आहेत. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला हे आरोपीला दिलासा देण्याबाबत निर्णय देत होते. न्यायमूर्ती पंकज मित्तल यांचा विश्वास होता की, जर असा अंतरिम जामीन दिला तर प्रत्येकजण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामीन मागेल आणि पॅरोलवर ाहेर येईल.
न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या त्रिकुट खंडपीठाने कोठडीमध्ये पॅरोल मंजूर करतेवेळी प्रचारादरम्यान ताहिर हुसैनने त्याच्या सुरू असलेल्या खटल्याबाबत कोणतेही अक्षर काढणार नाही, अशी अट दिली आहे.