मलाबार गोल्डकडून नवीन सॉलिटेअर वनची प्रस्तुती, नैसर्गिक हिऱ्यांचा संग्रह

27 Jan 2025 18:32:57



 
mala
 

 

मुंबई : सोने आणि दागिने निर्मितीतील जगातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह ब्रँड्सपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड कडून नैसर्गिक हिऱ्यांचा संग्रह असलेल्या ‘सॉलिटेअर वन’च्या प्रस्तुतीची सोमवारी घोषणा करण्यात आली. कंपनीकडून जाहीर करण्यात आल्या प्रमाणे हे सर्व हीरे जगातील सर्वोत्तम प्रयोगशाळांमधून तपासणी करण्यात आलेले आहेत. या ब्रँडसाठी प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही ब्रँड अम्बेसिडर असणार आहे. हा सॉलिटेअर वनच्या प्रसारासाठी विशेष प्रचार मोहीम आखण्यात आली असून त्यात आलिया भट्ट सहभागी होणार आहे. या प्रचार मोहीमेत या भारतीय परंपरा आणि त्याची हीऱ्यांशी घातली गेलेली सांगड उलगडून दाखवण्यात येणार आहे.

 

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही कंपनी मलाबार प्रॉमिसेसच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यासाठी काम करते. कंपनीकडून जाहीर झालेल्या माहीतीनुसार या दागिने तसेच हीरे, सर्व उच्च दर्जाची गुणवत्ता मानांकने प्राप्त असतात. उच्च दर्जाची सेवा आणि ग्राहक केंद्रित दृष्टीकोन यांमुळे भारत, आखाती देश, कॅनडा यांच्यासारख्या १३ देशांमध्ये ३७० हून अधिक शोरुम्सची स्थापना करण्यात यश मिळवले आहे. मलाबार गोल्ड्स अँड डायमंड्स यांच्याकडून आता पर्यंत १५ दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे.

 

या ब्रँडबद्दल मलाबार समुहाचे अध्यक्ष एमपी अहमद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की या सॉलिटेअरच्या माध्यमातून भारतीय परंपरा आणि हीऱ्यांचे नाते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून भारतीय स्त्रीचे लावण्य, तिच्या क्षमता यांचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नैसर्गिकता आणि खरेपणा यांचा अचूक मेळ साधला जाणार आहे.

 
 


Powered By Sangraha 9.0