ओटावा : खलिस्तानी (Khalistan) समर्थकांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये भारतीयांविरोधात निदर्शने केली होती. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करणारे पोस्टर्सही लावले होते. दरम्यान खलिस्तानचे झेंडे घेऊन आलेल्या या आंदोलकांनी पंजाबला भारतापासून वेगळे करा, अर्थातच पुन्हा भारताच्या फाळणीसाठी त्यांनी मागणी केली.
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, निदर्शनादरम्यान दहशतवादी हरदीप सिंह निज्जर आणि खलिस्तानी संघटनेचे प्रमुख गुरुपवंत सिंग पन्नू या खलिस्तानी नेत्याच्या नेतृत्वात घोषणाबाजी करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येचा गौरव करण्यात आला आहे. मात्र, व्हँकुव्हर पोलिसांनी दूतावासांच्या नजीकचा रस्ता आडवण्याचे काम केले.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये कॅनडामध्ये खलिस्तान्यांविरोधात कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येसाठी भारतावर परकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. मात्र संबंधित प्रकरणावर कोणीही पुरावे दिलेले नसल्याने त्यामुळे दोन्हीही देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. यामुळे आता संबंथित परिस्थिती ही आणखी बिघडली असल्याचे बोलले गेले आहे. मात्र या परिस्थितीवर तारतम्य बाळगले गेल्याची भूमिका आहे.