आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना चांगल्या सुविधा द्या!

27 Jan 2025 19:50:58
 
Fadanvis
 
मुंबई : क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांना आवश्यक त्या चांगल्या सुविधा द्याव्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, २७ जानेवारी रोजी दिल्या.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
हे वाचलंत का? -  दिव्यांगांच्या कल्याणासाठी कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित धोरण तयार करा!
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला आवश्यक सेवा सुविधा मिळण्याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक आणि फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळण्यासाठी क्रीडा विभागाने समन्वय करावा. राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर अधिक संधी मिळावी यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित होण्यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात. तसेच या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा वापर व्हावा," अशा सूचना त्यांनी दिल्या.
 
 
Powered By Sangraha 9.0