कट्टरपंथी आकिबने केले हिंदू युवतीचे अपहरण

27 Jan 2025 20:48:53

धर्मांतर
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील कारंडा पोलस ठाणे परिसरात कट्टरपंथी आकिबने हिंदू युवतीचे अपहरण केले. तिचे धर्मांतर करेन अशी धमकीही देण्यात आली. यामुळे आता संबंधित युवतीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना ११ जानेवारी २०२५ रोजी घडल्याचे वृत्त आहे. गावातील आकिब खान हा शाळेत जाणाऱ्या दोन बहिणींपैकी मोठ्या युवतीला दुचाकी वाहनावरून घेऊन गेला होता. या संबंधित घटनेची माहिती लहान मुलीने कुटुंबीयांना सांगितली.
 
प्रसारमाध्यमाच्या एका वृत्तानुसार, जेव्हा युवतीचे अपहरण झाले तेव्हा मुलीचे वडील आकिबच्या घरी दाखल झाले होते. तेव्हा आकिबच्या सावत्र आईने मुलीचे धर्मांतर करून आकिबसोबत तिचा निकाह करण्याबाबत धमकी दिली. या संबंधित धमकीमुळे कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
या प्रकरणात आता पीडितेच्या वडिलांनी आकिब, त्याची सावत्र आई, भाऊ आरिफ खान आणि काकूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवतीला धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास परावृत्त करत होता. तसेच तिच्याशी निकाह करून तिची विक्री करेल अशी भीती युवतीच्या कुटुंबियांना होती.
 
या संवेदनशील प्रकरणामध्ये पोलिसांनी तक्रारीनुसार, आरोपींवर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांनी मुलीच्या शोधासाठी छापेमारी सुरू असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0