सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा!

25 Jan 2025 12:16:59
 
Santosh Deshmukh
 
मुंबई : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी शनिवार, २५ जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मेट्रो सिनेपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून तो आझाद मैदानापर्यंत असेल.
 
संतोष देशमुख यांचे कुटुंबिय या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह असंख्य लोक या मोर्चात सहभागी झाले असून विविध पक्षांचे नेतेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. यासोबतच या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  तुमची आणि तुमच्या नेत्यांची वृत्ती रावणासारखी असुरी! चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
 
हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप सापडलेला नाही. गेल्या दीड महिन्यापासून एसआयटीचे पथक त्याचा शोध घेत आहेत. परंतू, तो अद्याप सापडला नसल्याने बीड पोलिसांकडून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0