घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही! चित्रा वाघ यांचा इशारा

24 Jan 2025 14:46:38
 
Chitra Wagh
 
मुंबई : घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही, अशा थेट इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला. मालेगावमधील तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांच्या निलंबनाच्या कारवाईवर त्यांनी 'X' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "निवडणुकीपूर्वी देवाभाऊंनी बांगलादेशी रोहिंग्यांना आव्हान दिले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात एकाही घुसखोराला राहू देणार नाही. जाती-आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अराजकतावादी शक्तींचा सामना करण्यासाठी आमचे सरकार कटीबध्द आहे. आमच्या देवाभाऊंची खासियत आहे ते दिलेला शब्द खरा करतात," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात अनेक आमदार, खासदार अनुपस्थित!
 
"मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू आहे हे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. जिहाद विरोधातल्या या लढाईत देवाभाऊंच्या साथीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी होते. चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी डिपार्टमेंटमधल्या देशद्रोह्यांना शोधायला मदत केली आणि बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र वाटणाऱ्या देशद्रोही असलेल्या अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला. याप्रकरणात दोषी असलेल्या तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांचे निलंबन करण्यात आले. देशद्रोह्यांनो आमच्या देवाभाऊंपासून सावध रहा. कारण इथे कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल नाहीतर बाराच्या भावात आत जाल," असा इशारा त्यांनी दिला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0