महाराष्ट्र शासनाच्या बार्जमधून गुजरातच्या बिबट्यांची राज्यात विनापरवाना 'एण्ट्री'; चौकशीतून गंभीर बाबी समोर

    23-Jan-2025
Total Views |
 gujarat releasing leopards in maharashtra border
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - गुजरात राज्यातील जेरंबद बिबटे नर्मदा नदीमधून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि. १८ जानेवारी रोजी स्थांनिकांनी समोर आणला होता (gujarat releasing leopards in maharashtra border). नंदुरबार वन विभागाने या प्रकरणाच्या केलेल्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे (gujarat releasing leopards in maharashtra border). महाराष्ट्र सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर करुन गुजरातचे वनकर्मचारी महाराष्ट्रात बिबटे सोडत असल्याचे उघड झाले आहे (gujarat releasing leopards in maharashtra border). अशा प्रकारे जर राज्य शासनाच्याच बोटींचा वापर करुन गुजरातमधील मानव-वन्यजीव संघर्षातून पकडलेले बिबटे महाराष्ट्राच्या हद्दीत सोडण्यात येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. (gujarat releasing leopards in maharashtra border)
 
 
 
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील मनिबेली येथे शनिवारी गुजरात वन विभागाकडून महाराष्ट्राच्या हद्दीत बिबट्या सोडण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न स्थानिकांनी उधळून लावला आणि गुजरात वन विभागाच्या लोकांना पिटाळून लावले. नंदुरबार वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी देखील गुजरात आणि मध्यप्रदेश वन विभागाने जलमार्गाचा वापर करुन अशा प्रकारे महाराष्ट्राच्या हद्दीत बिबटे आणून सोडले आहेत. प्रामुख्याने हे बिबटे मानव-वन्यजीव संघर्षामधून पकडल्याची शक्यता अधिक आहे.
 
 
 
या प्रकरणाची नंदुरबार वन विभागाने चौकशी केली असून सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर करुन गुजरातच्या वनकर्मचाऱ्यांनी बिबट्या सोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी गुजरात वन विभागाकडून चालढकल करण्यात आली आहे. वाट भरकटल्याने आम्ही त्याठिकाणी थांबल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सरदार सरोवर प्रकल्पातील बार्जचा वापर अशा प्रकारे गुजरातचे बिबटे महाराष्ट्रात सोडण्यासाठी करणे, धक्कादायक आहे. याविषयी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे की, बार्ज चालक हे गुजराती भाषिक असल्याने बऱ्याचदा त्या चालकांना विश्वासात घेऊन गुजरातचे वनकर्मचारी अशा पद्धतीची कामे करतात.
 
 
 
आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. १ फेब्रुवारी रोजी ठाणे, धुळे आणि नाशिक या वन विभागाची गुजरात वन विभागासोबत सापुतारा येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आम्ही हे प्रकरण उपस्थित करणार आहोत. - लक्ष्मण पाटील, उपवनसंरक्षक, मेवासी वन विभाग - नंदुरबार