दावोसमध्ये गडचिरोलीसाठी ५ हजार २५० कोटी रुपयांचा पहिला करार!

21 Jan 2025 18:05:51
 
Davos
दावोस : दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला सामंजस्य करार करण्यात आला आहे. कल्याणी समुहाकडून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
 
दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि कल्याणी समूहासोबत स्टील आणि संरक्षण क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारत फोर्ज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांची बैठक झाली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाली.
 
हे वाचलंत का? -  छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठा गटाला खिंडार! शहरप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
 
दरम्यान, कल्याणी समुहातर्फे गडचिरोलीत एकूण ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. याद्वारे गडचिरोली येथे ४,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0