राज्यात औरंग्याचे फलक लावण्यावर बंदी आणा; जळगावच्या 'त्या' घटनेनंतर होतेय मागणी

21 Jan 2025 16:02:28

Raver, Jalgaon

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Aurangzeb banner Jalgaon) 
इस्लामिक कट्टरपंथींकडून निघालेल्या संदलमध्ये औरंगजेब आणि ओवैसी बंधूंचा फक्त १५ मिनिटे असे लिहिलेले फलक झळकवण्याचा प्रकार जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोरा येथे घडला. दि. १६ जानेवारी रोजी निघालेल्या संदलचे फूटेज सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हिंदू समाजाला डिवचण्यासाठी मुद्दामहून असे कृत्य करण्याचा त्यांचा डाव असल्याचे यातून दिसते. संदलच्या आयोजकांवर तात्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा व राज्यात औरंगजेबचे फलक झळकवण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समिती, यावल (रावेर विभाग)च्या वतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : विहिंपच्या संत संमेलनात ज्वलंत विषयांवर चर्चा; 'वक्फ बोर्डचा मुद्दा' अग्रस्थानी



सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशात चिथावणीखोर, आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याबद्दल, लिखाण अथवा हावभाव केल्याबद्दल पोलिसांनी स्वतः हून गुन्हा नोंद करावा असे म्हटले आहे. तरीही येथे पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.

Powered By Sangraha 9.0