जेरुसलेम : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्भबंदीच्या (Hamas-Israel war) घोषणेनंतर रविवारी २० जानेवारी २०२५ रोजी गाजा पट्टीतून तीन इस्रायली मुलींची सुटका करण्यात आली आहे. रोमी गोनेने वय वर्षे २४ असून एमिली डमारी वय वर्षे २८ आहे. तर ३१ वर्षांची डरॉन अशा सुटका झालेल्या युवतींची नावे आहेत.
हमास आणि इस्रायलच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलेल्या तीन मुलींना प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या एका बेस कॅम्पमध्ये करण्यात आले होते. अशा परिस्थितीत मुली मायदेशी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्यांना सौंदर्यप्रसाधनांचे साहित्य, इतर सामानही दिले होते. रुग्णालयाबाहेर उभ्या असणाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयातून तिघांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. एमिलीचा एका फोटो आहे ज्यात ती हात दाखवून सर्वांना अभिवादन करत होती, परंतु तिच्या फोटोमध्ये फक्त दोन बोटे दिसत आहेत
दरम्यान चौकशीमध्ये असे नमूद करण्यात आले की, ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी जेव्हा हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. तेव्हा तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून हल्ले चढवले होते. त्यावेळी पीडितेच्या कुत्र्याला गोळी लागली. त्यावेळी तिच्या बोटांवर गोळीबार झाला. यानंतर हल्लेखोराला तुरुंगात डांबण्यात आले होते.