महाकुंभात 'वन नेशन वन इलेक्शन' बाबत काय म्हणाले रामनाथ कोविंद?

20 Jan 2025 18:22:37

Ramnath Kovind

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramnath Kovind in Mahakumbh) दिव्य प्रेम सेवा मिशन, हरिद्वारच्या वतीने महाकुंभ परिसरात 'एक राष्ट्र एक निवडणूक - आर्थिक, राजकीय, निवडणूक सुधारणा आणि विकसित भारताच्या संदर्भात' विषयावर वैचारिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांनी "वन नेशन वन इलेक्शन" चे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासकामांवर परिणाम होतो आणि अर्थव्यवस्थेवरही बोजा पडतो."


Ramnath Kovind

'निवडणुका एकाच वेळी घेतल्यास निवडणुकांवर होणारा खर्च आणि शिक्षकांच्या सहभागामुळे शिक्षण क्षेत्रावर होणारा परिणाम असे विविध प्रश्न सुटू शकतात.', यावर रामनाथ कोविंद यांनी भर दिला. हा कार्यक्रम भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी एक अर्थपूर्ण उपक्रम होता. राष्ट्र उभारणी आणि समाजातील सकारात्मक बदलासाठी समर्पित उपक्रम म्हणून हे स्वागतार्ह आहे.

Powered By Sangraha 9.0