नवी दिल्ली : बुद्धिबळपटू जग्गजेता डी. गुकेश (D. Gukesh) याला खेलरत्न पुरस्काराने मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतर आता अडाणी समूहाचे उद्योगपती गौतम अदानी हे डी. गुकेशच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. डी. गुकेश आणि त्याच्या पालकांना भेटून प्रेरणादायी वाटल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बुधवारी दि: २ जानेवारी २०२५ रोजी लिहिले.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि त्याच्या पालकांची भेट घेतली. यप्रकरणी एका पोस्टमध्ये, अदानी यांनी लिहिले की, गुकेश सारखे प्रतिभावंत नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत आणि चॅम्पियन्सची फौज तयार होत आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "डी. गुकेशला भेटणे आणि त्याची विजयगाथा ऐकणे हा एक अधिकार होता. त्याच्या पालकांना, डॉ. रजनीकांत आणि डॉ. पद्मवती यांना भेटणे तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांच्या मेहनतीने आज यशाचा पाया घातला आहे," असे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
"अवघ्या १८ व्या वर्षी, डी. गुकेशची शांतता आणि तेज हे भारताच्या न थांबणाऱ्या तरूणाईचा दाखला देण्याप्रमाणे आहे. त्याच्यासारखे व्यक्तिमत्व हे नवीन पिढीला प्रेरणा देत आहे. जागतिक बुद्धिबळपटूंची अनेक दशके वर्चस्व गाजवण्यास तयार असलेल्या चॅम्पियन्सची फौज तयार करण्यात आली आहे. हा आत्मविश्वासपूर्ण, पुनरागमन करणारा नवा भारत आहे. जय हिंद !"
बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांच्यानंतर डी. गुकेश हा बुद्धिबळ खेळातील विश्वविजेता आहे. त्याने गतवर्षी २०२४ च्या डिसेंबरमध्ये झालेल्या सिंगापूरातील FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्याच्या निर्णायक १४ व्या डावांत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहास रचला. १८ वर्षाचा सर्वात तरूण विश्वविजेता म्हणून त्याने आपला नावलौकिक मिळवला आहे.