मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णयांचा धडाका सुरु केला आहे. गुरुवार, २ जानेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रोजी राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.
यातील पहिला निर्णय हा महसूल विभागाशी संबंधित आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
हे वाचलंत का? - संजय राऊतांना मातोश्रीवर मारहाण! म्हणाले, "मी आणि उद्धव ठाकरे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू"
तसेच आता शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई बँकेतून होणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.