पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात! ९ जणांचा जागीच मृत्यू

17 Jan 2025 14:13:02
 
Pune-Nashik Accident
 
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली असून यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ एका आयशर टेम्पोने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटोला जोरदार धडक दिली. दरम्यान, हा ऑटो चेंडूप्रमाणे हवेत उडाला आणि पुढे उभ्या असलेल्या ब्रेक फेल झालेल्या एसटी बसवर जाऊन आदळला. या अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
 
हे वाचलंत का? -  दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर!
 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. यातील काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य  देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0