मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अजित पवार, पार्थ पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीसाठी पक्षाचे ११ उमेदवार रिंगणात आहेत.
हे वाचलंत का? - कृत्रिम बुद्धीमत्तेला चालना देण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणार!
येत्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागेल. दरम्यान, सर्वच पक्षांनी निवडणूकांची तयारी सुरु केली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.