एका महिन्यात १४०० वीजचोरांवर गुन्हे दाखल, सपा खासदाराचेही कनेक्शन

16 Jan 2025 14:51:37
 
Samajwadi Party
 
 
संभल : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण विभाग सातत्याने कारवाई करत आहे. गेल्या एका महिन्यात संभलमध्ये १४०० वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण १६ मशिदींचा समावेश असून आणि दोन मदरशांचा समावेश आहे. वीजचोरांकडून महावितरण विभागाने ११ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
 
संभलमधील महावितरण वीज विभागाने महिन्याभरामध्ये वीजचोरांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांना वीजचोरी करत असताना पकडण्यात आले होते. याप्रकरणात संबंधित विभागाने आतापर्यंत १०० जणांवर वीजेचोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून १६ मशीद आणि २ मदरशांचा समावेशही करण्यात आला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
 
वीज विभागाने समाजवादी खासदारवर आता दंडही ठोठावला आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी संभल प्रशानाने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांसह सपा खासदाराच्या परिसरामध्ये वीज तपासणीसाठी मोहिम राबविण्यात आली होती. वीजचोरीच्या खासदारावर गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना १.९१ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. वीज विभागाकडून सातत्याने मोहिम राबविण्यात येत आहे.
 
विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद कुमार गुप्ता यांनी याप्रकरणाबाबत सांगितले की, संभलमधील संबंधित परिसरामध्ये आतापर्यंत तब्बल १४०० वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणामध्ये १६ मशिदींचा आणि दोन मदरशांचाही समावेश करण्यात आला आहे. वीजचोरांवर ११ कोटींचा दंड ठोठावला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0