आसाम रायफल्सच्या कारवाईत ९ लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त!

11 Jan 2025 18:22:48

assam

दिसपूर : आसाम रायफल्स आणि मिझोरामच्या नार्कोटिक्स विभागाने ऐझॉल येथे केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये एकूण ९.५१ लाख रूपयांच्या ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण ३ जणांना अटक करण्यात यश आले आहे. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी जिरीबम येथे ही कारवाई करण्यात आली होती. यामध्ये एकूण दोन स्त्रीया आणि एका पुरूषाला अटक करण्यात आली आहे.

एकूण १३ किलोंचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पांढऱ्या पॉलिथिनमध्ये हा साठा सुरक्षा रक्षकांच्या हाती लागला. नार्कोटिक्स सीआयडीच्या विशेष पथकाकडे सारा मुद्देमाल सोपवण्यात आला. १० जानेवारी रोजी १६ हेक्टरवर पसरलेली गांजाची शेती त्रिपुरा वन विभाग आणि पोलिसांनी हटवली. मागच्या आठवड्यात १० हजार किलोची अवैध सुपारी जप्त करण्यात आली ज्यांची किंमत ७२ लाख रूपये एवढी होती. आसाम रायफल्स आणि सीमाशुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

 
Powered By Sangraha 9.0