मुंबई : आयुर्विमा कंपन्यांना नवीन पॉलिसी विक्रीतून मिळणाऱ्या प्रीमियम उत्पन्नात मोठी वाढ दिसून आली आहे. आयुर्विमा कंपन्यांना मिळणारे प्रीमियम उत्पन्न ऑगस्टमध्ये २२ टक्क्यांनी वाढून ३२,६४४ कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, सद्यस्थितीस आयुर्विमा कंपन्यांना नवीन पॉलिसींच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न मिळत असून प्रीमियममध्ये ऑगस्ट महिन्यात २२ टक्क्यांनी वाढला आहे.
दरम्यान, 'लाइफ इन्शुरन्स कौन्सिल' या उद्योग संस्थेने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत विमा कंपन्यांचे नवीन व्यवसाय प्रीमियम संकलन २१ टक्क्यांनी वाढून १,५४,१९४ कोटी रुपये इतके झाले आहे. यासह २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला उपस्थित असलेल्या एकूण एजंटच्या संख्येत ३.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या १,२७,६६१ कोटींवरून या वर्षी आतापर्यंतचे प्रीमियम कलेक्शन वाढून आता १,५४,१९४ कोटी रुपये झाले आहे. वैयक्तिक ग्राहक आणि कॉर्पोरेट ग्राहकांकडून विमा संरक्षणाची सतत मागणी असूनही नवीन पॉलिसी जारी करणाऱ्यांची संख्या ऑगस्ट २०२४ मध्ये १.४४ टक्क्यांनी घसरले आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत विमा कंपन्यांनी २४,२८,८९५ पॉलिसी विकल्या होत्या. जीवन विमा कंपन्यांनी गेल्या महिन्यात १,०८,१४७ जीवन विमा एजंट जोडले. यासह, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला उपस्थित असलेल्या एकूण एजंटच्या संख्येत ३.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.